Janani suraksha yojana मराठी 2024
Janani suraksha yojana 2024 संपूर्ण मराठी माहिती , पात्रता , आवश्यक कागदपत्रे , उद्देश, योजनेचा लाभ, अर्ज प्रक्रिया ,आणखी बरेच काही .
Janani suraksha yojana/जननी सुरक्षा योजना माहिती :
जननी सुरक्षा योजना ही योजना:
देशभरात अनेक योजना महाराष्ट्र व केंद्र सरकार द्वारे राबवले जातात तसेच जननी सुरक्षा योजना महाराष्ट्र सरकारने 2005 रोजी चालू केली. या योजनेअंतर्गत देशातील ग्रामीण आणि शहरी भागात राहणाऱ्या दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या कुटुंबातील गर्भवती मातांना महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी केंद्र शासनाने व महाराष्ट्र शासनाने जननी सुरक्षा योजना ही योजना चालू केली. या योजनेतून ग्रामीण व शहरी भागातील गर्भवती महिला व मातांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना चालू केली आहे.
Janani suraksha yojana/जननी सुरक्षा योजना अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती रेषे खालील मातांना मोफत प्रसूती सेवा आणि आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. या योजनेमुळे गर्भवती माता व महिलांना आर्थिक पाठभर मिळत आहे. जेणेकरून त्या गर्भवती असताना त्यांना आर्थिक अडचण भासू नये व त्यांना योग्य आर्थिक मदत मिळावी.
Janani suraksha yojana/ जननी सुरक्षा योजना तपशील :
जन सुरक्षा योजना ही केंद्र शासनाची राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत चालू करण्यात आली. ही योजना दिनांक 26- 10- 2005 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक विभागामार्फत निर्णय क्रमांक. जसूऊ 2005/10/670 . अंतर्गत सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व मध्य ग्रामीण भागांमध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली.
Janani suraksha yojana/जननी सुरक्षा योजना या योजनेची मान्यता केंद्र शासनाकडून ग्रामीण क्षेत्रासाठी व नदी ग्रामीण क्षेत्रासाठी 26/10/2005 रोजी महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर जननी सुरक्षा योजना ही 14 8 2006 रोजी महाराष्ट्रातील नागरी भागात जसे की नगरपालिका भागात महानगरपालिका भागात क्षेत्रात राबवण्यास मान्यता मिळाली व ही योजनाची महाराष्ट्र मध्ये अंमलबजावणी झाली.
जननी सुरक्षा योजना योजना लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा
Janani suraksha yojana/जननी सुरक्षा योजना उद्दिष्ट :
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण शहरी महानगरपालिका महानगरपालिका भागातील गरोदर मातांना तसेच दारिद्र्यरेषेखालील मातांना आणि अनुसूचित जमाती अनुसूचित जाती महिलांचे आरोग्य व त्यांचे होणारे संस्थांमध्ये होणारे प्रसूतीचे प्रमाण वाढवणे तसेच गरोदर मातांना आर्थिक मदत करणे या योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. तसेच या योजनेअंतर्गत दारिद्र रेषेखालील व द्र्यरेषेखाली नसणाऱ्या महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतात जेणेकरून त्यांना प्रसूती दरम्यान आर्थिक मदत मिळेल. तसेच माता मूर्ती व पाल्य मृत्यू चे प्रमाण कमी करणे या योजनेचे प्रामुख्याने महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
Janani suraksha yojana/जननी सुरक्षा योजना लाभार्थी पात्रता :
लाभार्थी महिलेची वय प्रसुती दरम्यान व नोंदणी करताना कमी ठिकाणी 19 वर्ष इतके असावे.
जननी सुरक्षा योजना ही योजना महिलेच्या दोन अपत्यापर्यंतच योजना आर्थिक मदत करते.
दारिद्र्य रेषेखालील सर्व गर्भवती महिला तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील सर्व गर्भवती महिला माता या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
महिला दारिद्र्यरेषेखालील नसतील तरीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
जननी सुरक्षा योजना व आशा वर्कर्स म्हणजेच (आरोग्य सेविका)
केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही आरोग्य बाबतीत कोणतेही योजना असल्या तरी आशा वर्कर चा महत्वाचा सहभाग त्या योजनेमध्ये असतो. आरोग्य सेविका ती योजना तळागाळात व लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याची काम करत असतात.
तसेच जननी सुरक्षा योजना मध्ये आशा वर्कर्सचे हे महत्त्वाचा सहभाग असतो.
आशा वर्कर्स ह्या गर्भवती महिलेचे आरोग्य संस्थेत नाव नोंद करून घेण्यापासून ते गर्भवती पात्र महिलेला योजनेचा किंवा लाभार्थींना त्यांचा लाभ मिळवून देण्यापर्यंत विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या ह्या सरकारी म्हणजेच आरोग्य सेविका करत असतात त्यांनाच आपण आपल्या भाषेमध्ये अशा वर्कर्स या नावाने ही ओळखतो.
बाल संघोपण योजनेचा लाभ घेण्यासाठी इथे क्लिक करा
आरोग्य सेविका म्हणजेच आशा वर्कर्स यांचा या योजनेमध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा सहभाग असतो
गावागावांमध्ये जाऊन गर्भवती महिलेचे नाव नोंद करून घेणे
नाव नोंद केल्यानंतर लाभार्थींना जननी कार्ड मिळवून देणे.
त्यांना अर्ज भरण्यास मदत करणे.
पात्र लाभार्थींकडून आवश्यक कागदपत्रे जमा करून घेणे व त्याची पूर्तता करणे.
वेळोवेळी प्रसुती पूर्वी तपासण्या करून घेणे व योग्य ती काळजी घेण्यास सांगणे.
गर्भवती महिलांचे लसीकरण आणि लोहयुक्त गोळ्या मिळवून देणे व त्या व्यतिरिक्त मदत करणे.
लाभार्थींची बँक खाते नसल्यास त्यांचे बँक खाते उघडून देण्यास त्यांना पूर्णपणे मदत करणे.
गर्भवती महिलांना शासकीय आरोग्य संस्थेत प्रसूती करिता प्रवृत्त करणे.
Janani suraksha yojana/जननी सुरक्षा योजना अंतर्गत मिळणारे लाभ :
शहरी भागातील महिलांना मिळणारे लाभ:
शहरी भागातील पात्र लाभार्थी गर्भवती महिला जर शासकीय किंवा अशासकीय आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य संस्थेमध्ये प्रसूती झाली असल्यास तिला प्रसूतीच्या तारखेपासून ते सात दिवसांमध्ये 700 रुपये इतकी रक्कम धनादेशाद्वारे दिली जाते किंवा ती रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या बँका अकाउंट मध्ये जमा केली जाते.
ग्रामीण भागातील महिलांना मिळणारे लाभ:
ग्रामीण भागातील पात्र लाभार्थी व गरोदर महिलां जर त्यांची प्रसूती शासकीय किंवा अशासकीय आरोग्य केंद्रातून आरोग्य संस्थेतून प्रसूती केल्यास त्यांना प्रसूतीनंतरच्या सात दिवसांच्या आत मध्ये सहाशे रुपये इतकी रक्कम धनादेशाद्वारे किंवा ही रक्कम लाभार्थी महिलेच्या अकाउंट मध्ये थेट रक्कम जमा केली जाते.
जर लाभार्थी महिलेचे प्रसूती दरम्यान सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यास पात्र महिलेस 1500 रुपये लाभार्थी महेश धनादेशाद्वारे किंवा महिलेच्या बँक अकाउंट मध्ये प्रसूतीनंतर सात दिवसाच्या आत मध्ये पैसे बँक अकाउंट मध्ये पाठवले जतात.
शहरी तसेच ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना लाभार्थ्यांची प्रसूती आरोग्य सेवा केंद्र मध्ये न जाता घरी झाली तर पाचशे रुपये एवढी रक्कम प्रसुतीच्या तारखे नंतर सात दिवसाच्या आत लाभार्थ्याच्या अकाउंट मध्ये थेट पाठवले जातील किंवा लाभार्थ्याला दहा ते शेजारी दिले जातील.
Janani suraksha yojana/जननी सुरक्षा योजना आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड झेरॉक्स
रहिवासी दाखला
जात प्रमाणपत्र
शाळेचे प्रमाणपत्र
जननी सुरक्षा योजना कार्ड
2 पासपोर्ट साईज फोटो
लाभार्थी महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा अंगणवाडी केंद्रात जाऊन भेट देऊ शकतात. व नाव नोंदणी करण्याचा अर्ज प्राप्त करू शकतात.
नजीकच्या शासकीय रुग्णाल यातील अशा सेविका व आरोग्य सेविका ही लाभार्थी महिलेस व गर्भवती महिलेस मदत करतील.
तसेच ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.